लोणार ः जैन सहेली ग्रुपतर्फे हळदी- कुंकवाचा कार्यक्रम

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून जैन सोशल ग्रुपतर्फे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमस्थळी सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश देण्यात आला. यावेळी महिलांनी विविध सामग्रीचे स्टॉल तसेच आनंदनगरीचे आयोजन केले होते. महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते. विविध पारितोषिके ठेवण्यात आली. ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांना मास्क …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून जैन सोशल ग्रुपतर्फे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमस्थळी सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश देण्यात आला. यावेळी महिलांनी विविध सामग्रीचे स्टॉल तसेच आनंदनगरीचे आयोजन केले होते. महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते. विविध पारितोषिके ठेवण्यात आली. ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.