लोणार तालुक्यात कोविड लसीकरणाला सुरुवात

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या कोरोना लसीकरणाची कोविड योद्धे आतुरतेने वाट बघत होते. त्याचा योग आज जुळून आला. लोणार तालुक्यात आज, 25 जानेवारीला कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.यावेळी जि. प. सदस्य दिलीप वाघ, पंचायत समिती सदस्य डॉ. लाहोटी यांच्या हस्ते लसीकरणास …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या कोरोना लसीकरणाची कोविड योद्धे आतुरतेने वाट बघत होते. त्याचा योग आज जुळून आला. लोणार तालुक्यात आज, 25 जानेवारीला कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.
यावेळी जि. प. सदस्य दिलीप वाघ, पंचायत समिती सदस्य डॉ. लाहोटी यांच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी आरोग्य विभागा मार्फत करण्यात आली असून, पहिल्या दिवशी 150 कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लस घेणे आनंददायी अनुभव असल्याची भावना लोणार ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फिरोज शाह यांनी लस घेतल्यानंतर व्यक्त केली. ज्या कोरोना महामारी सोबत दोन हात करताना रात्रंदिवस मेहनत करावी लागली ती महामारी या लसीकरणाने नष्ट व्हावी, असा अशावाद तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी व्यक्त केला. या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बिडिओ अस्मिता तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, अधीक्षक डॉ. फिरोज शाह, प्रा. आ. केंद्र सुलतानपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये, डॉ. संत्रे मॅडम, डॉ. सानप, कोविड सेंटर लोणारचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, डॉ. विपुल तनपुरे यांच्यासह स्थानिक आरोग्य केंद्राचे रुग्ण कल्याण समिती सदस्य उपस्थित होते.