लोणार तालुक्‍यात कोल्ह्याने माजवली दहशत; पाच जणांवर केला हल्ला

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार तालुक्यातील आरडव शिवारात कोल्ह्याने दहशत माजवली असून, त्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. एका बैलावरही त्याने हल्ला चढवला. ही घटना ४ सप्टेंबरला घडली. आरडव येथील जगदीश नरवाडे यांचा गावशिवारात कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी कोंबड्या सोडण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते …
 
लोणार तालुक्‍यात कोल्ह्याने माजवली दहशत; पाच जणांवर केला हल्ला

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार तालुक्‍यातील आरडव शिवारात कोल्ह्याने दहशत माजवली असून, त्‍याच्‍या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. एका बैलावरही त्‍याने हल्ला चढवला. ही घटना ४ सप्‍टेंबरला घडली.

लोणार तालुक्‍यात कोल्ह्याने माजवली दहशत; पाच जणांवर केला हल्ला

आरडव येथील जगदीश नरवाडे यांचा गावशिवारात कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी कोंबड्या सोडण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. याच परिसरातील सुभाष येवले, नारायण येवले यांनाही कोल्ह्याने घायाळ केले. आरडवपासून काहीच अंतरावर असलेल्या दाभा परिसरात सुरेश मोरे व त्‍यांच्‍या आईवरही कोल्ह्याने हल्ला चढवत जखमी केले. या घटनेमुळे कोल्ह्याची दहशत परिसरात पसरली आहे.