ल्युडो खेळताना सतत हरत असल्याने केला मित्राचा खून

मुंबई : जगात आईच्या नात्यानंतर सर्वश्रेष्ठ म्हणून मित्रत्वाच्या नात्याचा उल्लेख केला जातो. मित्रासाठी काय पण करणारे या जगात अनेक असतात.पण याच जगात क्षुल्लक कारणावरून मित्राच्या जीवावर उठणारे नराधमही आहेत. मोबाईलमध्ये ल्युडो गेम खेळताना मित्र आपल्याला सतत हरवतो. कधीच जिंकू देत नाही, याचा राग मनात बसल्याने रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राचा बेदम मारहाण करून खून केल्याची …
 

मुंबई : जगात आईच्या नात्यानंतर सर्वश्रेष्ठ म्हणून मित्रत्वाच्या नात्याचा उल्लेख केला जातो. मित्रासाठी काय पण करणारे या जगात अनेक असतात.पण याच जगात क्षुल्लक कारणावरून मित्राच्या जीवावर उठणारे नराधमही आहेत. मोबाईलमध्ये ल्युडो गेम खेळताना मित्र आपल्याला सतत हरवतो. कधीच जिंकू देत नाही, याचा राग मनात बसल्याने रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राचा बेदम मारहाण करून खून केल्याची घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली आहे.एवढ्यावरच न थांबता कुणाला संशय येऊ नये म्हणून दहा हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून मित्राचे अंत्यसंस्कारदेखील परस्पर उरकले. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, १७ मार्च २०२१ रोजी तुकाराम नलावडे व त्याचा मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी हे मालाड दारूवाला कंपाउंड परिसरात मोबाईलवर ल्युडो गेम खेळत होता. त्यात अनेक राऊंड तुकारामने जिंकल्या व जिमी हरत गेला. पण काही वेळाने त्याचा रागाचा पारा चढला व त्याने तुकारामला बेदम मारहाण सुरू केली.जिमीने केलेल्या मारहाणीमुळे तुकाराम जागीच मृत्यूमुखी पावला. ही बाब अंगलट येणार असे लक्षात येताच पैसे देऊन तुकारामच्या नावाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून घेऊन त्याच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले. पण काही वेळाने त्याचे बिंग फुटले पोलिसांनी जिमीच्या मुसक्या आवळल्या.