वडाळी येथून 18 वर्षीय युवती घरातून निघून गेली…

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः नांदुरा तालुक्यातील वडाळी येथील 18 वर्षीय युवती 24 फेब्रुवारीच्या सकाळी 10 पासून गायब आहे. घरातून ती कुणाला काही न सांगता निघून गेली. बराच शोध घेतल्यानंतर अखेर आज तिच्या आईने नांदुरा पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार केली आहे. ज्योती सुधाकर गोरे नावाची ही मुलगी नांदुऱ्यातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. तिची आई शोभा सुधाकर गोरे यांनी …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः नांदुरा तालुक्यातील वडाळी येथील 18 वर्षीय युवती 24 फेब्रुवारीच्‍या सकाळी 10 पासून गायब आहे. घरातून ती कुणाला काही न सांगता निघून गेली. बराच शोध घेतल्यानंतर अखेर आज तिच्‍या आईने नांदुरा पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार केली आहे.

ज्‍योती  सुधाकर गोरे नावाची ही मुलगी नांदुऱ्यातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. तिची आई शोभा सुधाकर गोरे यांनी नांदुरा पोलिसांना तिला शोधून आणण्यासाठी साकडे घातले आहे. बांधा सडपातळ, चेहरा लांबट, अंगात गुलाबी ड्रेस, पायात काळी चप्पल, रंग सावळा, उंची अंदाजे पाच फूट, कपाळावर गोंदलेले अशा वर्णनाची मुलगी कोणाला आढल्यास नांदुरा पोलीस स्टेशनशी (07265-221028) किंवा पो. काँ. संजय परधान मो नं. 9689901519 यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.