वडील बराच वेळ कॉल करत होते… मुलाने उचलला नाही, घरी येऊन पाहतात तर…; मेहकर तालुक्यातील धक्‍कादायक घटना

मेहकर (नारायण इंगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 4 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास मेहकर तालुक्यातील बटाळा येथे घडली. करण कुंडलिक टेकाळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. करण गावातीलच एका मेडिकल वर कामाला होता. दुपारच्या सुमारास तो जेवण करण्यासाठी घरी गेला होता. त्यावळी …
 

मेहकर (नारायण इंगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 4 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास मेहकर तालुक्यातील बटाळा येथे घडली. करण कुंडलिक टेकाळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

करण गावातीलच एका मेडिकल वर कामाला होता. दुपारच्या सुमारास तो जेवण करण्यासाठी घरी गेला होता. त्यावळी करणची आई शेतात तर वडील मेहकर येथे आले होते. दुपारी वडिलांनी करणला फोन केला असता तो बंद दाखवण्यात येत होता. करणचे वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथे पाठवला आहे. वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.