वनरक्षकांवर मेंढपाळांचा हल्ला; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्ञानगंगा अभयारण्यातील जमिनीवर चरण्यासाठी मेंढ्या सोडल्यानंतर वनरक्षकांनी विरोध केला. त्यामुळे मेंढपाळांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याची घटना १० जुलैला हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेरू बिटमध्ये घडली. याप्रकरणी काल, ११ जुलै रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात सरकारी कामात व्यत्यय आणून हाणामारी केल्यामुळे तीन मेंढपाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ज्ञानगंगा अभयारण्यातील जमिनीवर चरण्यासाठी मेंढ्या सोडल्‍यानंतर वनरक्षकांनी विरोध केला. त्‍यामुळे मेंढपाळांनी त्‍यांच्‍यावर हल्ला चढवल्याची घटना १० जुलैला हिवरखेड पोलीस ठाण्याच्‍या हद्दीतील गेरू बिटमध्ये घडली. याप्रकरणी काल, ११ जुलै रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात सरकारी कामात व्यत्यय आणून हाणामारी केल्यामुळे तीन मेंढपाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ धंदर यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. १० जुलैला ज्ञानगंगा अभयारण्यातील गेरू बिटचे वनरक्षक गजानन पोटे हे अवैध चराई, अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांच्यासोबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. धंदर सुद्धा उपस्थित होते. यावेळी काही नागरिक हे अवैधरित्या वनविभागाच्या जागेवर मेंढ्या चारत होते. तेव्हा श्री. पोटे यांनी तिघांना इथे मेंढ्या चारू नका असे म्हटले असता तिघांनी त्‍यांच्यावर लाठीने हल्ला चढवला. वनपरिक्षेत्र अधिकारी धंदर यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही लाठीने जबर मारहाण केली. तू आमचे काहीच वाकडे करू शकत नाही आणखी केस केली तर जीवे मारू, अशी धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.