वन्यप्राण्याने केली गायीची शिकार!; शेतकर्‍याला नुकसान भरपाईची मागणी

उंद्री (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंद्री (ता. चिखली) जवळील चिंचपूर येथील चंदूलाल चव्हाण यांच्या मालकीची गाय जंगलात चरण्यासाठी रात्री घरी परतली नाही. 20 जानेवारीला श्री. चव्हाण यांनी शोध घेऊनही गाय सापडली नाही. आज 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता आसोला शिवारात गाय मृत अवस्थेत दिसली. गाईला वन्यप्राण्याने खाल्ल्याचे दिसून येत आहे. या बाबत गाय मालकाने वनपरिक्षेत्र …
 

उंद्री (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंद्री (ता. चिखली) जवळील चिंचपूर येथील चंदूलाल चव्हाण यांच्या मालकीची गाय जंगलात चरण्यासाठी रात्री घरी परतली नाही. 20 जानेवारीला श्री. चव्हाण यांनी शोध घेऊनही गाय सापडली नाही. आज 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता आसोला शिवारात गाय मृत अवस्थेत दिसली. गाईला वन्यप्राण्याने खाल्ल्याचे दिसून येत आहे. या बाबत गाय मालकाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गाय दुधाळ होती. तिची अंदाजे किंमत 12-15 हजार रुपये होती.