वय 22… कामगिरी अचाट!; घरफोड्यांत पीएच.डी.; 22 पोलीस ठाण्यांना हवा होता, अखेर बुलडाणा शहर पोलिसांनी पकडला!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारही मुलुखांची पोलीस ज्याला शोधत होती, तब्बल 22 पोलीस ठाण्यात ज्याच्याविरोधात घरफोड्या, चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशा अवघ्या 22 वर्षांच्या तरुणास अखेर पकडण्यात बुलडाणा शहर पोलिसांना यश आले आहे. दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे या घरफोड्यांत पीएच.डी. केलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याला जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. जालना, औरंगाबाद, …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारही मुलुखांची पोलीस ज्याला शोधत होती, तब्बल 22 पोलीस ठाण्यात ज्याच्याविरोधात घरफोड्या, चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशा अवघ्या 22 वर्षांच्या तरुणास अखेर पकडण्यात बुलडाणा शहर पोलिसांना यश आले आहे.

दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे या घरफोड्यांत पीएच.डी. केलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याला जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. जालना, औरंगाबाद, नांदेड आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे आता सर्व चोर्‍यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सुंदरखेड येथील मेडिकल फोडून दीपकने 45 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसांना तो हवा होता. 25 नोव्हेंबरला त्याने ही चोरी केली होती, तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. माळविहिर येथील स्वप्नील सोनोने यांचे हे मेडिकल आहे. रोख सात हजार रुपये, लॅपटॉप व अन्य साहित्य असा 45 हजारांचा ऐवज चोरी गेला होता.