वरखेडच्‍या ग्रामस्‍थांनी सोडले उपोषण! अधिकाऱ्यांच्‍या आश्वासनानंतर घेतले लिंबूपाणी!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेला अतिक्रमणांनी विळखा घातलेला आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढावे, या मागणीसाठी २ आॅक्टोबरपासून माजी सरपंच विनोद कणखर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ग्रामसेवकांशी झालेल्या चर्चेनंतर अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने या उपोषणाची …
 
वरखेडच्‍या ग्रामस्‍थांनी सोडले उपोषण! अधिकाऱ्यांच्‍या आश्वासनानंतर घेतले लिंबूपाणी!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेला अतिक्रमणांनी विळखा घातलेला आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढावे, या मागणीसाठी २ आॅक्टोबरपासून माजी सरपंच विनोद कणखर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ग्रामसेवकांशी झालेल्या चर्चेनंतर अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने या उपोषणाची लिंबू शरबत देऊन सांगता करण्यात आली. माजी सरपंच विनोद कणखर, शाळा समिती अध्यक्ष गणेश भगत यांनी ग्रामस्‍थांसह उपोषण केले. या वेळी विष्णू पाटील कुळसुंदर, अशोकराव पडघान, डाॅ. सत्यंेद्र भुसारी, दासा पाटील, संजय गाडेकर, गजानन वायाळ, अंकुश तायडे, शाहीद पटेल, विनायक सरनाईक, नंदु घडयाळे, रमेश कणखर आदींची उपस्‍थिती होती.