वरवंडच्‍या महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; हिरडवमध्ये कोरोना उद्रेक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, वरवंड (ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे 517 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 341 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, हिरडव (ता. लोणार) येथे कोरोना उद्रेक झाल्यागत चित्र असून, छोट्याशा गावात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, वरवंड (ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे 517 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 341 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. दरम्‍यान, हिरडव (ता. लोणार) येथे कोरोना उद्रेक झाल्‍यागत चित्र असून, छोट्याशा गावात तब्‍बल 24 बाधित आढळले आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1851 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 517 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 487 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1166 तर रॅपिड टेस्टमधील 168 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, पळसखेड भट 1, सुंदरखेड 2, कळमखेड 1, वरवंड 3, गिरडा 2, येळगाव 1, शिरपूर 2, करडी 1, पिंपळगाव सराई 1, चांडोळ 1, बुलडाणा शहर : 78, चिखली शहर : 89, चिखली तालुका : खैरव 4, बोरगाव वसू 2, अमडापूर 3, गोदरी 1, मालखेड 1, पिंपळगाव 1, भालगाव 2, कोळेगाव 1, पेठ 1, धोत्रा नाईक 2, बेराळा 1, केळवद 3, सवणा 5, सोनेवाडी 1, भानखेड 1, किन्होळा 1, पळसखेड जयंती 3, वळती 1, दरेगाव 1, मेरा बुद्रूक 3, अंबाशी 1, मेरा खुर्द 2, रायपूर 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : सायळा 5, गोमेधर 1, दुधा 2, जानेफळ 2, देऊळगाव साकर्षा 1, थार 7, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : पोफळी 1, तरोडा 1, शेलापूर 1, डिडोळा 1, सिंदखेड लपाली 2, मलकापूर शहर : 54, मलकापूर तालुका : माकनेर 1, दुधलगाव 2, दाताळा 2, लोणवडी 1, निंबारी 1, भाडगणी 1, मोरखेड 3, जांभूळधाबा 2, खामगाव शहर : 40, खामगाव तालुका : सुटाळा खुर्द 4, सुटाळा बुद्रूक 1, पिंप्राळा 1, घाटपुरी 1, शेगाव शहर : 22, शेगाव तालुका : सगोडा 1, हिंगणा 1, पहुरजिरा 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 2, वरवट बकाल 1, जळगाव जामोद शहर : 7, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 2, वडशिंगी 2, सुनगाव 1, लोणार शहर : 4, लोणार तालुका : पिंपळनेर 4, गोत्रा 4, पांगरा दराडे 10, हिरडव 24, मांडवा 2, रायगाव 1,किनगाव जट्टू 1, वडगाव तेजन 5, देऊळगाव 3, देऊळगाव राजा शहर : 7, देऊळगाव राजा तालुका : धानोरा 1, सिनगाव जहाँगिर 3, उमरद 1, अंढेरा 1, सिंदखेड राजा शहर : 3, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 6, खैरखेड 1, आडगाव राजा 3, माळ सावरगाव 3, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : धानोरा 1, विटाळी 1, शेंबा 1, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 4, पिंपळफाटा ता. जाफराबाद जि. जालना 1, मालेगाव जि. वाशिम 2, वालसावंगी जि. जालना 4, वाकड पुणे 1  अशाप्रकारे जिल्ह्यात 517 रुग्ण आढळले आहेत.

341 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 341 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 20, खामगाव : 52, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 11, अपंग विद्यालय 52, मुलींचे वसतिगृह 4, देऊळगाव राजा : 30, मेहकर : 23, लोणार : 5, जळगाव जामोद : 11, सिंदखेड राजा : 17, नांदुरा : 26, मलकापूर : 31, शेगाव : 35, मोताळा : 14, संग्रामपूर : 15.

2844 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 150639 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18776 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 6751 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे.  जिल्ह्यात आज अखेर एकूण 21821 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2844 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 201 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.