वरवट बकाल शिवारात देशीचे दारूचे 65 खोके जप्‍त; साडेपाच लाख रुपयांची कारवाई

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) शिवारात केलेल्या कारवाईत एक दुचाकी, बोलेरो पीकअप वाहनासह 90 मि.ली.च्या बाटल्या भरलेले देशी दारूचे 65 खोके जप्त करण्यात आले. एकूण 5 लाख 67 रुपयांची ही कारवाई 3 एप्रिलला करण्यात आली. सय्यद अमीन सय्यद निजाम (रा. जळगाव जामोद) याला ताब्यात घेण्यात आले असून, …
 

संग्रामपूर  (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) शिवारात केलेल्या कारवाईत एक दुचाकी, बोलेरो पीकअप वाहनासह 90 मि.ली.च्‍या बाटल्‍या भरलेले देशी दारूचे 65 खोके जप्‍त करण्यात आले. एकूण 5 लाख 67 रुपयांची ही कारवाई 3 एप्रिलला करण्यात आली. सय्यद अमीन सय्यद निजाम (रा. जळगाव जामोद) याला ताब्‍यात घेण्यात आले असून, त्‍याचे साथीदार कृष्णा कवळकार (रा. धानोरा महासिद्ध) व अमोल रमेश चोपडे (रा. जळगाव जामोद) यांनी घटनास्‍थळावरून पळ काढला. तिन्‍ही आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली निरिक्षक आर. एन. गावंडे, दुय्यम निरिक्षक एन. के. मावळे यांच्‍यासह पथकातील सह दुय्यम निरिक्षक जी. एन. सोनकांबळे, अमोल सुसरे, गणेश मोरे, पी. एस. देशमुख, महिला जवान सौ. शारदा निळे यांनी केली.