वळतीच्‍या महिलेचं शतक कोरोनाने हुकवलं!; वयाच्‍या 100 व्‍या वर्षी ठरली कोरोनाची बळी!!, एकूण 3 बळी, नवे 128 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वळती (ता. नांदुरा) येथील 100 वर्षीय वृद्ध महिला शतक पार करणारच होती, पण कोरोनाने तिला हरवलं आणि प्राण हिरावले. त्यांच्यासह उपचारादरम्यान सुटाळा (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, जामोद (ता. जळगाव जामोद) येथील 42 वर्षीय महिलेचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज, 1 जूनला 128 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, …
 
वळतीच्‍या महिलेचं शतक कोरोनाने हुकवलं!; वयाच्‍या 100 व्‍या वर्षी ठरली कोरोनाची बळी!!, एकूण 3 बळी, नवे 128 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वळती (ता. नांदुरा) येथील 100 वर्षीय वृद्ध महिला शतक पार करणारच होती, पण कोरोनाने तिला हरवलं आणि प्राण हिरावले. त्‍यांच्‍यासह उपचारादरम्यान सुटाळा (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, जामोद (ता. जळगाव जामोद) येथील 42 वर्षीय महिलेचाही कोरोनाने मृत्‍यू झाला आहे. आज, 1 जूनला 128 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 320 रुग्‍णांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4091 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3963 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 128 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड टेस्टमधील 94 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 598 तर रॅपिड टेस्टमधील 3365 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 6, बुलडाणा तालुका : भादोला 1, येळगाव 1, पाडळी 4, सव 2, साखळी 1, देव्हारी 1, अजिसपूर 1, देवपूर 1, हतेडी 4, जामठी 3, चांडोळ 1, धामणगाव 1, रायपूर 1, देऊळगाव घाट 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, कोऱ्हाळी बाजार 1, वडगाव 2, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : जयपूर लांडे 1, नागापूर 1, पिंपळगाव राजा 1, बोरजवळा 1, शेगाव शहर : 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : खैरव 4, केळवद 1, करवंड 1, खंडाळा 1, करणखेड 1, सावरखेड 1, खोर 1, मलकापूर शहर :1 , मलकापूर तालुका : धोंगर्डी 1, देऊळगाव राजा शहर : 4 , देऊळगाव राजा तालुका : सावखेड भोई 1, जांभोरा 1, गिरोली 1, पिंपळगाव 3, मांडवा 1, गारखेड 1, संग्रामपूर तालुका : उकळी बुद्रूक 1, काटेल 1, सिंदखेड राजा शहर : 5, सिंदखेड राजा तालुका : सुलजगाव 1, साखरखेर्डा 4, सावरगाव 1, शेलगाव राऊत 1, मोहाडी 1, मेहकर तालुका : जानेफळ 4, हिवरा आश्रम 5, उमरा 1, आंध्रुड 1, कळमेश्वर 1, बाऱ्हाई 1, जळगाव जामोद तालुका : खांडवी 1, पिंपळगाव काळे 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : नायगाव 1, तांदूळवाडी 3, टाकरखेड 1, निमगाव 7, पिंपळखुटा धांडे 1, आलमपूर 1, दादूलगाव 1, लोणार तालुका : देऊळगाव कोळ 1, चिखला 1, भुमराळा 2, शिवणी पिसा 2, देऊळगाव कुंडपाळ 1, वडगाव 1, दाभा 1, कसारी 1, परजिल्हा बदनापूर 1, बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 128 रुग्ण आढळले आहेत.

1634 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 320 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 484659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 82663 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 709 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84906 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 1634 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 609 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.