वाघ्याच्या डोळ्यादेखत मुरळीवर केला सामूहिक अत्याचार

नगर जिल्ह्यातील निंदनीrय घटना; दोघांना अटक एक फरार नगर : समाजातील लैंगिक विकृती वरचेवर वाढत आहे.गुन्हेगारी कारवायांनाही धरबंद उरलेला नाही. नगर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून चरितार्थ चालविणार्या वाघ्या- मुरळीच्या जोडीला वाटेत अडवून वाघ्याला मारहाण करून बांधून ठेवत त्याच्या डोळ्यादेखत मुरळीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नगर जिल्ह्यात …
 

नगर जिल्ह्यातील निंदनीrय घटना; दोघांना अटक एक फरार

नगर : समाजातील लैंगिक विकृती वरचेवर वाढत आहे.गुन्हेगारी कारवायांनाही धरबंद उरलेला नाही. नगर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून चरितार्थ चालविणार्‍या वाघ्या- मुरळीच्या जोडीला वाटेत अडवून वाघ्याला मारहाण करून बांधून ठेवत त्याच्या डोळ्यादेखत मुरळीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
ही घटना नगर तालुक्यात निंबोडी शिवारात घडली आहे. आष्टी तालुक्यातील एक महिला जागरण गोंधळात मुरलीचे काम करते.ती एका कार्यक्रमासाठी तिच्या सहकार्‍यासोबत नगर तालुक्यात गेली होती. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघे दुचाकीवर गावाकडे परत जात होते. रस्यात निंबोडी शिवारात ते पाणी पिण्यासाठी थांबले. त्याचवेळी तीन जण तेोि आले. त्यांनी त्या दोघांना धमकावरत जवळच्या शेतात नेले. तिथे महिलेसोबतच्या सहकार्‍याला बांधून ठेवत महिलेवर सामूहिक अत्याचर केला. तसेच त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन ते आरोपी फरार झाले. हे आरोपी शेतात काम करणारे मजूर असल्याचे समजते.घटनेनंतर पीडित महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी पुणे आणि नगर येथून दोन आरोपींना अटक केली असून एक आरोप फरार आहे, असे सपोनि भैय्यासाहेब देशमुख यांनी सांगितले.