वाघ- बिबट्यांच्या नखांची तस्करी करणारे तिघे पकडले; नांदुऱ्यात कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाघ आणि बिबट्यांच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना बुलडाणा वनविभागाने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई काल, १३ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास नांदुरा- मलकापूर रोडवर नांदुरा शहरातील हनुमान मूर्तीसमोर करण्यात आली. तिन्ही आरोपींना आज, १४ जुलैला नांदुरा येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वाघ व बिबट्यांना ठार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाघ आणि बिबट्यांच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना बुलडाणा वनविभागाने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई काल, १३ जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास नांदुरा- मलकापूर रोडवर नांदुरा शहरातील हनुमान मूर्तीसमोर करण्यात आली. तिन्ही आरोपींना आज, १४ जुलैला नांदुरा येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

वाघ व बिबट्यांना ठार मारून त्यांच्या मौल्यवान नखांची तस्करी बुलडाणा जिल्ह्यात होत असल्याची माहिती वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई व मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेल अमरावती यांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदुरा येथील हनुमान मूर्ती परिसरात वनविभागाने साफळा रचला व तीन तस्करांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून वाघ व बिबट्याची १० नखे, एक मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला. तस्करांपैकी दोघे जळगाव खानदेश जिल्ह्यातील तर १ आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील आहे. ही कारवाई बुलडाणा मुख्य उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (मेहकर) संदीप गवारे, सहाय्यक वन संरक्षक (बुलडाणा) रंजित गायकवाड, वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो मुंबईचे आदिमलय्या, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ, स्मिता राजहंस, गणेश टेकाळे, के. आर. मोरे, एस.एच. पठाण, आकाश सारडा, मुकेश जावरकर, जीवन दहिकर, रामेश्वर हाडे, संजय धिकार यांनी केली. तपास सहाय्यक वनसंरक्षक (बुलडाणा) रंजीत गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा हे करीत आहेत.