वाघ-बिबट्याच्‍या नख, दातांची तस्करी : सुनगावमध्ये सहावा आरोपी घेतला ताब्‍यात; गुन्ह्यात वापरलेली अवजारे जप्‍त

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिबट्या व वाघाच्या नखे व दातांची तस्करी करणारी तिघांची टोळी वनविभागाने नांदुऱ्यात १३ जुलैला पकडली होती. चौकशीतून त्यांचे आणखी दोन साथीदारही वनविभागाच्या गळाला लागले आहेत. या सर्वांची चौकशी सुरू असताना सहावा आरोपीही सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथून ताब्यात घेण्यात आला आहे. सुनगावातील दोन छाप्यांत गुन्ह्यात वापरलेली अवजारे जप्त करण्यात …
 
वाघ-बिबट्याच्‍या नख, दातांची तस्करी : सुनगावमध्ये सहावा आरोपी घेतला ताब्‍यात; गुन्ह्यात वापरलेली अवजारे जप्‍त

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिबट्या व वाघाच्या नखे व दातांची तस्करी करणारी तिघांची टोळी वनविभागाने नांदुऱ्यात १३ जुलैला पकडली होती. चौकशीतून त्‍यांचे आणखी दोन साथीदारही वनविभागाच्‍या गळाला लागले आहेत. या सर्वांची चौकशी सुरू असताना सहावा आरोपीही सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथून ताब्‍यात घेण्यात आला आहे. सुनगावातील दोन छाप्यांत गुन्ह्यात वापरलेली अवजारे जप्‍त करण्यात आली आहेत.

मुक्ताईनगर व जळगाव जामोद येथील दोन आरोपींना १५ जुलैला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्‍या आधारे आज, १६ जुलैला वनविभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या सुनगाव येथे दोन ठिकाणी छापे मारले. या ठिकाणावरून बिबट्या व वाघाचे दात व गुन्ह्यात वापरलेली अवजारे जप्त करण्यात आली. गावातून एकाला अटकही करण्यात आली आहे. त्‍याचे नाव उघड करण्यास तूर्त तपासामुळे सूत्रांनी नकार दिला. ही कारवाई उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जळगाव जामोदचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश आडे व कर्मचारी तसेच मोताळा, खामगाव व जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तपास सहायक वनसंरक्षक रणजीत गायकवाड, वनपरिक्षेत्रअधिकारी नेहा मुरकुटे करत आहेत.