वाझे यांनी आरोप केलेले नंबर वन साहेब, देशमुख नव्हेत, दुसरेच!

मुंबई : मुंबईतील बारमालकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे नंबर वन साहेबांना देण्यासाठी घेतले जात होते. हे नंबर वन साहेब अनिल देशमुख नव्हेत, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आहेत, असा आरोप देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी केला. ईडीपुढे मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने दिलेल्या जबाबात नंबर वन साहेबांसाठी पैसे …
 

मुंबई : मुंबईतील बारमालकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे नंबर वन साहेबांना देण्यासाठी घेतले जात होते. हे नंबर वन साहेब अनिल देशमुख नव्हेत, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आहेत, असा आरोप देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी केला.

ईडीपुढे मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने दिलेल्या जबाबात नंबर वन साहेबांसाठी पैसे जमा केले जात असल्याचे सांगितले होते. हे नंबर वन साहेब अनिल देशमुख असल्याचे तपास यंत्रणा सांगत असताना देशमुख यांच्या वकिलांनी मात्र परमबीर सिंह यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. देशमुख हे परमबीर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते; परंतु ते करण्याअगोदर आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो. त्यामुळे बदनामीचा दावा मागे राहिला, असे ते म्हणाले. शंभर कोटी रुपयांच्या खंडणीतील कथित रक्कम वाझे यांना देण्यात आल्याचा जबाब मालकांनी जबाब दिला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असे वाझे सांगत होता. हे नंबर वन म्हणजे नक्की कोण हे ईडीला समजत नव्हते. वाझे याच्या जबाबात त्याचे उत्तर आले आहे. ते देशमुख असल्याचे त्याने म्हटले आहे.