वाढदिवसाच्या पार्टीत तलवारी नाचवल्या प्रकरणी उपनगराध्यक्ष, नगरसेवकासहीत आणखी दोघांना उचलले; चार दिवसांची पोलीस कोठडी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर नगर परिषद उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवारी नाचविल्या प्रकरणी पोलिसांनी नगर परिषद उपाध्यक्ष आणि एका नगरसेवकासहीत आणखी दोघांना अटक केली आहे. आता याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 6 झाली असून, काल सकाळीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या होत्या. दरम्यान या सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर नगर परिषद उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवारी नाचविल्या प्रकरणी पोलिसांनी नगर परिषद उपाध्यक्ष आणि एका नगरसेवकासहीत आणखी दोघांना अटक केली आहे. आता याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 6 झाली असून, काल सकाळीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या होत्या. दरम्यान या सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मलकापूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष हाजी रशीदखा जमदार यांच्या वाढदिवसानिमित्त 10 फेब्रुवारीला सायंकाळी मलकापुरातील पारपेठ भागातील न. प. शाळेत कार्यकर्ता मेळावा आणि वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्यासहीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात जमावातील एका टोळीने तलवारी काढून नाचवल्या होत्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी काल पहाटेच दोघांना उचलत त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या होत्या. दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास याप्रकरणी आणखी चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये न.प. उपाध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशीद खाँ जमदार (71), काँग्रेस नगरसेवक मो.जावेद मो. सलीम कुरेशी (40), मो. फैजुरहमान मो. सैफुरहमाण(25), शे. इमाम शे. आजम (25, सर्व रा. पारपेठ मलकापूर) यांचा समावेश आहे. दरम्यान या सर्वांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जमदार यांची बिघडली प्रकृती
दरम्यान न.प. उपाध्यक्ष जमदार यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.