वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार श्वेताताई महाले यांचा निर्णय; बॅनर्स लावण्याऐवजी कोरोना योद्ध्यांचा करा सन्‍मान!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा 27 मार्च रोजी वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्वेताताईंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा वाढदिवस कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा लाइव्हशी बोलताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या, की २७ मार्च रोजी असलेला माझा वाढदिवस यावर्षी मी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा 27 मार्च रोजी वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्वेताताईंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांनी त्यांचा वाढदिवस कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे.

वाढदिवसाच्‍या पूर्वसंध्येला बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना आमदार श्वेताताई महाले म्‍हणाल्या, की २७ मार्च रोजी असलेला माझा वाढदिवस यावर्षी मी आपल्या सर्वांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मागच्या १ वर्षापासून अविरतपणे कार्यरत असलेल्या कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना नम्र विनंती आहे की मला पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन किंवा बॅनर्स लावून शुभेच्छा देण्याऐवजी यावर्षी आपल्या प्रभागातील, गावातील, परिसरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करावा. त्यांचा सत्कार ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. त्यांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सदिच्छा आजन्म अशाच भक्कमपणे पाठीशी असू देण्याची  विनंतीसुद्धा त्यांनी केली आहे.