वाण देण्यासाठी मंदिरात गेली अन् तिथेच कळली धक्कादायक घटना!; सौभाग्यावर आघात!!; सिंदखेड राजा तालुक्यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकरसंक्रांत असल्याने ती ग्रामदैवत श्री कामाक्षी देवीच्या मंदिरात गेलेली अन् तिथेच तिला पतीचा अपघातात मृत्यूची झाल्याची बातमी कळली… शेतात झाडाखाली आराम करणार्या युवकाला नियंत्रण सुटलेल्या ट्रकने चिरडले. ही घटना किनगाव राजा- दुसरबीड मार्गावरील ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर 14 जानेवारीला दुपारी घडली. माधव नारायण झोरे (36, रा. किनगाव राजा) असे अपघातात …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकरसंक्रांत असल्याने ती ग्रामदैवत श्री कामाक्षी देवीच्या मंदिरात गेलेली अन् तिथेच तिला पतीचा अपघातात मृत्यूची झाल्याची बातमी कळली… शेतात झाडाखाली आराम करणार्‍या युवकाला नियंत्रण सुटलेल्या ट्रकने चिरडले. ही घटना किनगाव राजा- दुसरबीड मार्गावरील ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर 14 जानेवारीला दुपारी घडली.

माधव नारायण झोरे (36, रा. किनगाव राजा) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. दुपारच्या सुमारास माधव शेतातील बाभळीच्या झाडाखाली झोपला होता. त्याचदरम्यान ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर ट्रकचालक रिव्हर्स घेण्याच्या नादात ट्रकवरील नियंत्रण हरवून बसला आणि ट्रक थेट शेतात घुसून माधवच्या अंगावरून गेला. यात माधवचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी आरडाओरड केली. ट्रकचालक फरारी झाला. किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ मैनाजी नारायण झोरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माधव यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.