वादळी पावसाने झालेल्या नुकसानीच्‍या पाहणीसाठी आमदार सौ. श्वेताताई महाले बांधावर!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यात आलेल्या वादळी पावसामुळे कांदा, गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पेठ येथील दिलीप बापूराव शेळके आणि परसराम पुंडलिक शेळके यांच्या कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. अजित येळे, तालुका …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यात आलेल्या वादळी पावसामुळे कांदा, गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पेठ येथील दिलीप बापूराव शेळके आणि परसराम पुंडलिक शेळके यांच्या कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. अजित येळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, अनिल शेळके, संतोष शेळके,कृषी सहायक, तलाठी उपस्थित होते.

नुकसान भरपाईसाठी केल्या सूचना

तालुक्यात सर्वच ठिकाणी वादळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली . यावर्षी पाऊस बरा असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली. यात उशिरा पेरणी झालेले गहू, हरभरा आणि कांदा ही पिके मोठ्या प्रमाणावर उभी आहे. या उभ्या असलेल्या पिकांना या वादळी पाऊस व गारपिटीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यात कांदा हे पीक मुळातच अतिशय नाजूक पीक आहे. बियाण्यासाठी लागवड केलेल्या कांद्याला थोड्याश्या वादळाने ही खूप मोठे नुकसान होत असते. या वादळी पावसात कांदा पिकाचे खूप नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.