वाद होऊन तरुणाला रोडवर आपटले, तो 6 दिवसांपासून येईना शुद्धीवर!; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्षुल्लक कारणावरून वाद होऊन डांबरी रोडवर आपटल्याने 1 जण गंभीर जखमी झाला असून, बेशुद्धावस्थेत आहे. 16 एप्रिलला ही घटना घडली, तेव्हापासून आज, 22 एप्रिलपर्यंत तो शुद्धीवर आलेला नाही. डोंगरखंडाळा (ता. बुलडाणा) येथे ही घटना घडली होती. सतिश रामराव शिंदे (22) असे बेशुद्धावस्थेतील युवकाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः क्षुल्लक कारणावरून वाद होऊन डांबरी रोडवर आपटल्याने 1 जण गंभीर जखमी झाला असून, बेशुद्धावस्‍थेत आहे. 16 एप्रिलला ही घटना घडली, तेव्‍हापासून आज, 22 एप्रिलपर्यंत तो शुद्धीवर आलेला नाही. डोंगरखंडाळा (ता. बुलडाणा) येथे ही घटना घडली होती. सतिश रामराव शिंदे (22) असे बेशुद्धावस्‍थेतील युवकाचे नाव असून, त्‍याच्‍यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सतिशच्या आईने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

सतिश गावातच मजुरी करतो. 16 एप्रिलला तो शेणखत भरण्यासाठी कामावर गेला होता. रात्री 8 वाजता गावातीलच महिलेने तुमचा मुलगा आमच्या घरासमोर बेशुद्ध पडलेला असल्याचे त्‍याच्या आईला सांगितले. तेव्हा सतिशवर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्‍याला जिल्हा रुग्‍णालयात आणण्यात आले.  सतीशचे गावातीलच दीपक हिमा जाधवसोबत वाद झाला होता. दीपकने त्‍याला डांबरी रोडवर आपटले होते. 17 एप्रिलला सकाळी सतिशला झटके येऊ लागले होते. आजपर्यंत तो बेशुद्ध असल्याने काल, 21 एप्रिलला रात्री त्याच्या आईने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.