वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर हल्ला; धाडच्‍या त्‍या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पत्रकार एकवटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सागर पेंढारकर आणि पोलीस कर्मचारी डिगांबर कपाटे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बुलडाणा तालुका पत्रकार संघाने धाड पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मराठवाडा हद्दीत जाऊन जुगारावर कारवाई करणारे हे पोलीस घटनास्थळी चार तासांपासून गोंधळ घालत होते. पत्रकार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सागर पेंढारकर आणि पोलीस कर्मचारी डिगांबर कपाटे यांच्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बुलडाणा तालुका पत्रकार संघाने धाड पोलीस ठाण्याच्‍या ठाणेदारांकडे केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, की मराठवाडा हद्दीत जाऊन जुगारावर कारवाई करणारे हे पोलीस घटनास्‍थळी चार तासांपासून गोंधळ घालत होते. पत्रकार आल्याने त्‍यांचे पित्त खवळले. त्‍यांनी पत्रकारांना शिविगाळ करून त्‍यांच्‍यावर हात उचलत मारहाण केली. दोषी पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा प्रशासनाच्‍या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर डॉ. विजय जट्टे, नागेश मोहिते, रामदास सनान्से, मो. मुस्‍ताक, बबन फेपाळे, मो. जाकीर, शेख नदीम, योगेश उबाळे, गजानन मरमट, प्रमोद गायकवाड, शेख मजर, दीपक जाधव, सागर जयस्वाल, सुरेश सोनुने, गणेश भालके, गणेश अंभोरे, संजय देशमुख आदींच्या सह्या आहेत.