वाळूमाफियांना पावसाचा दणका, रात्री वाळू उपसा करणारे ३० टिप्पर अडकले पूर्णा नदीपात्रात

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाळू माफियांना पावसाच्या वाढलेल्या पाण्याने चांगलाच दणका दिला. सावरगाव तेली (ता. लोणार) सह वाघाळा शिवारातील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांचे तब्बल ३० टिप्पर नदीपात्रात अडकले आहेत. काल रात्री उशिरा ही घटना घडली असली तरी अजूनही नदीपात्रातील पाणी कमी झाले नसल्याने हे सर्व टिप्पर नदीपात्रातच अडकून आहेत. ते बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाळू माफियांना पावसाच्या वाढलेल्या पाण्याने चांगलाच दणका दिला. सावरगाव तेली (ता. लोणार) सह वाघाळा शिवारातील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांचे तब्बल ३० टिप्पर नदीपात्रात अडकले आहेत.

काल रात्री उशिरा ही घटना घडली असली तरी अजूनही नदीपात्रातील पाणी कमी झाले नसल्याने हे सर्व टिप्पर नदीपात्रातच अडकून आहेत. ते बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मंठा तालुक्यातील सासखेडा येथे अंदाजे ६ आणि सावरगाव तेली येथे १६ हायवा नदीपात्रात अडकून पडले आहेत.

पूर्णा नदीपात्रातून काही ठिकाणाहून वाळू उपशाला परवानगी नसताना देखील वाळू माफिया वाळू रात्रीची उपसून नदीकाठी आणून त्याची साठवणूक करून ठेवतात. नंतर दिवसभर ती वाळू विकली जाते. काल रात्री टिप्परमध्ये वाळू भरली असताना अचानक नदीपात्रात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सर्व टिप्परच्या चालकांनी टिप्पर नदीतच उभे ठेवून नदीबाहेर पळ काढला. परिणामी सर्व ३० टिप्पर नदीपात्रात अडकले. आज दिवसभरात यातील काही टिप्पर बाहेर काढण्यात यश आल असून काही टिप्पर नदी बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.