वाहऽऽ… मेहकरच्या कन्येचा जगात डंका; जागतिक नृत्य स्पर्धेत जगात दुसरी!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत असलेली 13 वर्षीय विद्यार्थिनी श्रुती विजय बाजड हिचा नृत्य स्पर्धेतील एका गटात संपूर्ण जगातून द्वितीय क्रमांक आला आहे.अखील नटराजम् आंतरसांस्कृतिक संघातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा 2021 घेण्यात आली होती. 21 फेब्रुवारी 2021 ला अनास इंडिया युट्यूब चॅनलवर पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल 4 मार्च …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत असलेली 13 वर्षीय विद्यार्थिनी श्रुती विजय बाजड हिचा नृत्य स्पर्धेतील एका गटात संपूर्ण जगातून द्वितीय क्रमांक आला आहे.
अखील नटराजम्‌ आंतरसांस्कृतिक संघातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा 2021 घेण्यात आली होती. 21 फेब्रुवारी 2021 ला अनास इंडिया युट्यूब चॅनलवर पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल 4 मार्च 2021 ला ऑनलाइन घोषित करण्यात आला. यात सोलो कॉन्टेम्परी ज्युनियर या गटात श्रुती जगात दुसरी आली. स्पर्धेमध्ये संपूर्ण जगातून बर्‍याच स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. श्रुती विजय बाजड हिला नृत्य प्रशिक्षक निरज गायकवाड यांनी नृत्याचे धडे दिले. मेहकर येथील सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड.विजय हिंमतराव बाजड यांची कन्या असलेल्या श्रृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.