वाहऽऽ याला म्‍हणतात धाडस… शेतकऱ्यानेच चोरट्यांना पकडून केले पोलिसांच्‍या हवाली!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या धाडसाची चर्चा सध्या होत आहे. या शेतकऱ्याने सवर्णा शिवारात आपल्या शेतात बोअरवेलची वायर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. ते दोघे अन् हा एकटा शेतकरी असूनही दोघांवर भारी पडला, हे विशेष. झाले असे की, 15 मार्च रोजी पहाटे किशोर प्रभाकर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याच्‍या धाडसाची चर्चा सध्या होत आहे. या शेतकऱ्याने सवर्णा शिवारात आपल्या शेतात बोअरवेलची वायर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रंगेहात पकडले आणि पोलिसांच्‍या हवाली केले. ते दोघे अन्‌ हा एकटा शेतकरी असूनही दोघांवर भारी पडला, हे विशेष.

झाले असे की, 15 मार्च रोजी पहाटे किशोर प्रभाकर पहुरकर (25, रा. सवर्णा, ता. शेगाव) त्यांच्या शेतातील मकाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. त्यांना नागोराव कैलास गव्हांदे (37, रा. वाकडी तालुका तेल्हारा) व वसीम शहा रहीम शहा (25) हे दोघे बोअरवेलची वायर कापताना दिसले.  त्यांच्याजवळ जळालेल्या वायरची कॉपरसुद्धा (किंमत पाचशे रुपये) होती. पहुरकर यांनी धाडसाने दोन्‍ही चोरट्यांनी पकडले आणि तसेच मुद्देमालासह शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली असून, तपास ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे करत आहेत.

बाजूच्‍याच शेतात आणखी एक चोरी

सवर्णा शिवारातच आणखी एक चोरी समोर आली असून, पहुरकर यांच्‍या शेताच्‍या बाजूला असलेल्या रामेश्वर रामदास चव्हाण (37, रा. मोदीनगर, शेगाव) यांच्‍या शेतात चोरी झाली आहे. ते सकाळी शेतात गेले असता कोणीतरी चोरट्याने 3 एचपीची मोटर (अंदाजे किंमत चार हजार) व 300 फूट कॉपर केबल वायर (अंदाजे किंमत आठ हजार रुपये) चोरून नेल्याचे दिसून आले. त्‍यांनीही आज संध्याकाळी पाच वाजता शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली.