वाह.. याला म्हणतात प्रामाणिकपणा..! लाखाची सोन्याची पोत लाँड्रीवाल्याने केली परत

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगात कितीही वाईट घटना घडल्या तरी काही घटना अशाही घडतात ज्यामुळे समाजात अजूनही चांगली माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा टिकून असल्याचा प्रत्यय येतो. मेहकर शहरातही याचा अनुभव आला आहे. बसस्थानक परिसरातील एका लाँड्रीवाल्याने कपड्यांत आढळलेली एक लाख रुपयांची सोन्याची पोत परत नागरिकाला केली. देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील आरोग्य केंद्रात सहायक आरोग्य …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगात कितीही वाईट घटना घडल्या तरी काही घटना अशाही घडतात ज्यामुळे समाजात अजूनही चांगली माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा टिकून असल्याचा प्रत्यय येतो. मेहकर शहरातही याचा अनुभव आला आहे. बसस्थानक परिसरातील एका लाँड्रीवाल्याने कपड्यांत आढळलेली एक लाख रुपयांची सोन्याची पोत परत नागरिकाला केली. देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील आरोग्य केंद्रात सहायक आरोग्य कर्मचारी असलेले देविदास जगताप यांनी आपले कपडे प्रेस करण्यासाठी श्याम माधव काकडे यांच्या दुकानात दिले होते. कपडे प्रेस करताना खिशात सोन्याची पोत असल्याचे काकडे यांना दिसले. त्यांनी तातडीने जगताप यांना कळवले. माधव काकडे व गिरिधर पैठणकर यांनी जगताप यांच्याकडे पोत सुपूर्द केली.