विकृतीचा कळस… विष पाजून दोन कुत्र्यांची हत्या; चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात असलेल्या दोन कुत्र्यांची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी पळसखेड नागो (ता. बुलडाणा) येथे समोर आले. शेतकऱ्याने चार जणांवर संशय व्यक्त केल्याने बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध आज, १६ जुलैला गुन्हा दाखल केला. अविनाश राजेश साबळे,अंकुश भानुदास झनके, संजय भानुदास झनके, प्रमोद (राजेश …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात असलेल्या दोन कुत्र्यांची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी पळसखेड नागो (ता. बुलडाणा) येथे समोर आले. शेतकऱ्याने चार जणांवर संशय व्यक्त केल्याने बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध आज, १६ जुलैला गुन्हा दाखल केला. अविनाश राजेश साबळे,अंकुश भानुदास झनके, संजय भानुदास झनके, प्रमोद (राजेश साबळे यांचा जावई) सर्व रा. पळसखेड नागो अशी संशयितांची नावे आहेत.

राजेश बन्सीलाल राठोड (रा. पळसखेड नाईक) हे काल १५ जुलैला सायंकाळी त्यांच्या शेतातील गोठ्यात गेले. तेव्हा त्यांना शेतातील गोठ्यात त्यांचे दोन कुत्रे मृतावस्थेत दिसले. बुलडाणा ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही कुत्र्यांची बुलडाणा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उत्तरीय तपासणी करण्यात आली. राजेश राठोड यांनी पळसखेड नागो येथील चौघांवर संशय व्यक्त केला आहे. राजेश राठोड यांचे भाऊ डॉ. संदेश बन्सीलाल राठोड (रा. पळसखेड नाईक, ह.मु. सुवर्णनगर बुलडाणा) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सुनील हिवाळे करीत आहेत.