विकृतीचा कळस… 16 वर्षीय पुतणीवर काकाचा लैंगिक अत्याचार; खामगाव तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पवित्र नात्याला काळिमा फासत काकाने 16 वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ढोरपगाव (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी काल, 25 मे रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 40 वर्षीय काकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली. पीडितेला काकाने ‘तुझी काकू घरी नाही. स्वयंपाक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पवित्र नात्याला काळिमा फासत काकाने 16 वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ढोरपगाव (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्‍या वडिलांनी काल, 25 मे रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 40 वर्षीय काकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याला तातडीने अटक करण्यात आली.

पीडितेला काकाने ‘तुझी काकू घरी नाही. स्वयंपाक करून दे…’ असे म्‍हणून बोलावले होते. याचवेळी तिला एकटी पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 16 मे रोजी घडली होती. मात्र घाबरून मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. मात्र तिची अवस्‍था पाहून घरच्यांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आई- वडिलांना सांगितली. त्यामुळे काल वडिलांनी पीडितेसह पिंपळगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीला अटक करून आज, 26 मे रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.