विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नको; एमपीएससी परीक्षा ठरल्‍यानुसारच घ्या ः आमदार श्वेताताई महाले यांची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलून सरकारने विध्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 14 मार्च 2021 रोजी होणार होती. मात्र कोविडचे कारण देत या परीक्षा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलून सरकारने विध्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चिखलीच्‍या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 14 मार्च 2021 रोजी होणार होती. मात्र कोविडचे कारण देत या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्‍यावर बुलडाणा जिल्ह्यातील भावी अधिकाऱ्यांनी अर्थात परीक्षार्थ्यांनी संतप्‍त प्रतिक्रिया नोंदवल्या. याबाबत बुलडाणा लाइव्‍हने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत सौ. महाले पाटील यांनी भूमिका मांडली. त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले, की कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच बेरोजगारी वाढलेली आहे. अशातच पुन्हा एकदा राज्य सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या चिखली मतदारसंघातील तसेच बुलडाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी वर्षभरापासून एमपीएससीची तयारी करत आहेत. ही परीक्षा पुढे ढकलल्यास ते वयबाह्य होतील. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अंत न पाहता तात्काळ आपला निर्णय मागे घ्यावा आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोविड संदर्भातील प्रोटोकॉल पाळून एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असे सौ. महाले पाटील म्हणाल्या.