विद्यार्थ्यांनो, अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १२ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मातंग समाजातील दहावी, बारावी, पदवी व पदविका, अभियांत्रिक व वैद्यकीय कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींची जिल्हानिहाय निवड केली जाते. या लाभासाठी मातंग समाजातंर्गत असणाऱ्या 12 पोट जातींमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यात मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मातंग समाजातील दहावी, बारावी, पदवी व पदविका, अभियांत्रिक व वैद्यकीय कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींची जिल्हानिहाय निवड केली जाते. या लाभासाठी मातंग समाजातंर्गत असणाऱ्या 12 पोट जातींमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यात मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा आदी पोटजातींचा समावेश आहे.

लोकशाहीर साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड प्रत, गुणपित्रका प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी दाखल्यांसह सादर करावे. अर्ज दोन प्रतीमध्ये जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.