विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या चिखलीत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या, 16 मे 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 16 मे रोजी दुपारी 2.30 वाजता अकोला येथून मोटारीने चिखलीकडे (जि. बुलडाणा) प्रयाण, दुपारी 4 वाजता चिखली येथे आगमन होईल. दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या, 16 मे 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 16 मे रोजी दुपारी 2.30 वाजता अकोला येथून मोटारीने चिखलीकडे (जि. बुलडाणा) प्रयाण, दुपारी 4 वाजता चिखली येथे आगमन होईल. दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्‍नाने सुरू होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन त्‍यांच्‍या हस्‍ते होईल. त्‍यानंतर सायंकाळी 5 वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.