विनाकारण फिरणारे महाभाग घालतात पोलिसांसोबत वाद; कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या 68 जणांना दंड

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू आहेत. तरीही अनेक जण जसे कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, तसेच निर्बंधांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. अशा महाभागांवर कारवाईसाठी पुढे सरसावणाऱ्या पोलिसांशीही ते भांडताना दिसतात. गेल्या तीन दिवसांत शहर पोलिसांनी कडक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्‍यावश्यक सेवा, त्‍याही सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू आहेत. तरीही अनेक जण जसे कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, तसेच निर्बंधांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. अशा महाभागांवर कारवाईसाठी पुढे सरसावणाऱ्या पोलिसांशीही ते भांडताना दिसतात. गेल्या तीन दिवसांत शहर पोलिसांनी कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या 68 जणांना दंड ठोठावला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 125 जणांवरही कारवाई करण्यात आली असून, 18 हजारापेक्षा अधिक दंड त्‍यांच्‍याकडून वसूल केला आहे.  नगरपालिका प्रशासनानेही 5 पथके कारवाईसाठी तयार केली असून, नगरपालिकेने गेल्या 2 दिवसांत 29600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 500 तर विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांसोबत रोजच वाद वाढल्याने पोलिसांचीही मानसिक अवस्‍था बिघडत चालली आहे.