विनापरवाना स्‍फोटके बाळगणाऱ्यास मलकापूर तालुक्‍यात पकडले; एलसीबीची कारवाई; सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः विनापरवाना स्फोटके बाळगणाऱ्या दुधलगाव बुद्रूक (ता. मलकापूर) येथील एकास काल, 12 जूनला सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे जिलेटिनच्या कांड्या, डेटोनेटर मिळून आले. गोपनीय माहितीवरून “एलसीबी’चे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार यांच्या पथकाने दुधलगाव बुद्रूक येथे छापा मारून सुरेश उर्फ अविनाश प्रल्हाद झनके (43, …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः विनापरवाना स्‍फोटके बाळगणाऱ्या दुधलगाव बुद्रूक (ता. मलकापूर) येथील एकास काल, 12 जूनला सायंकाळी सव्वा सातच्‍या सुमारास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडे जिलेटिनच्‍या कांड्या, डेटोनेटर मिळून आले.

गोपनीय माहितीवरून “एलसीबी’चे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार यांच्‍या पथकाने दुधलगाव बुद्रूक येथे छापा मारून सुरेश उर्फ अविनाश प्रल्हाद झनके (43, रा. दुधलगाव बुद्रूक) याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडे तीन खाकी रंगाच्या खोक्‍यांत 540 जिलेटीनच्या कांड्या (एकूण किंमत 13500 रुपये), एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये 600 नग डेटोनेटर (किंमत 12000 रुपये) मिळून आले. त्‍याच्‍या ताब्‍यातील ट्रॅक्टरही (MH 28 T 9367, किंमत 4 लाख रुपये) जप्‍त करण्यात आले. असा एकूण 4,25,500 रुपयांचा स्फोटकांचा माल मिळून आला. त्‍याच्‍याकडे स्फोटके बाळगण्याचा आणि ब्लास्टिंग ट्रॅक्टरबाबतचा परवाना नव्‍हता. झनके विरोधात अवैध विनापरवाना निष्काळजीपणे स्फोटके बाळगल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. तायडे करत आहेत.