विवाहानंतर नवरदेव मंडपातच कोसळला; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्‍यू, धाड येथील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवरदेवाची वरात आली… लग्नही धूमधडाक्यात झाले. जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. पाहुणे वधू- वरांचे अभिनंदन करत होते… अन् अचानक नवरदेव कोसळला. त्याची तब्येत बिघडली. उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यूनेही गाठले. ही धक्कादायक घटना धाड (ता. बुलडाणा) येथे काल, १५ सप्टेंबर रोजी घडली. सिल्लोड (जि. औरंगाबाद) तालुक्यातील भराडी येथील आसिफ खान (३३) …
 
विवाहानंतर नवरदेव मंडपातच कोसळला; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्‍यू, धाड येथील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवरदेवाची वरात आली… लग्नही धूमधडाक्यात झाले. जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. पाहुणे वधू- वरांचे अभिनंदन करत होते… अन्‌ अचानक नवरदेव कोसळला. त्‍याची तब्येत बिघडली. उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यूनेही गाठले. ही धक्कादायक घटना धाड (ता. बुलडाणा) येथे काल, १५ सप्टेंबर रोजी घडली.

सिल्लोड (जि. औरंगाबाद) तालुक्यातील भराडी येथील आसिफ खान (३३) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. धाड येथील अमन खान यांच्या मुलीशी आसिफचा विवाह ठरला होता. ठरल्याप्रमाणे लग्नाची सर्व तयारी झाली. वऱ्हाड सकाळीच धाड येथे दाखल झाले. वेळेवर दोघांचा निकाह पार पडला. जेवणाच्या पंगतीदेखील सुरू झाल्या होत्या. अशातच नवरदेव आसिफ खान याची तब्येत कोसळून तो जागीच कोसळला. त्‍याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. मात्र नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता लग्नमंडपात पोहोचताच उत्साहाच्या वातावरणावर विरजण पडले. संध्याकाळी भराडी येथे आसिफ खानचा अंत्यविधी झाला.