विवाहितेचा खून करून झाडाला लटकवले; किनगाव जट्टू येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 26 वर्षीय विवाहितेचा खून करून तिला झाडाला लटकविण्यात आल्याची घटना काल, 25 मार्चला सकाळी किनगाव जट्टू शिवारात दुसरबीड रस्त्याजवळ उघडकीस आला. सौ. नीता वाडे (26, रा. आईचा तांडा, किनगाव जट्टू) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. निता ही तिच्या 3 वर्षीय मुलासह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 26 वर्षीय विवाहितेचा खून करून तिला झाडाला लटकविण्यात आल्याची घटना काल, 25 मार्चला सकाळी किनगाव जट्टू शिवारात दुसरबीड रस्त्याजवळ उघडकीस आला. सौ. नीता वाडे (26, रा. आईचा तांडा, किनगाव जट्टू) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी  बिबी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

निता ही तिच्‍या 3 वर्षीय मुलासह किनगाव जट्टू येथेच आई- वडिलांकडे राहत होती. मजुरी करून उदनिर्वाह  करत होती. काल दुसरबीडकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील निंबाच्या झाडाला  तिचा मृतदेह लटकलेला दिसला. नागरिकांनी ही माहिती लगेच पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि ठसे तज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. टावरे, एपीआय श्री. व्यवहारे, पोलीस अंमलदार विजय पवार, विकास देशमुख, अर्जुन सांगळे, जयदेव टेकाळे, मोहम्मद परसुवाले, सुभाष गीते, मंगल बिवरे, रोहिदास पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.