विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या ८ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारचाकी घेण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौ. वैशाली अमोल जाधव (२८, रा. रोहडा, ता. चिखली ह. मु. पाचला) या विवाहितेने पती अमोल भास्कर जाधव, सासू प्रमिला भास्कर जाधव, सासरा भास्कर जाधव, दीर विशाल भास्कर जाधव, दिरानी कांचन विशाल …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारचाकी घेण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. वैशाली अमोल जाधव (२८, रा. रोहडा, ता. चिखली ह. मु. पाचला) या विवाहितेने पती अमोल भास्कर जाधव, सासू प्रमिला भास्कर जाधव, सासरा भास्कर जाधव, दीर विशाल भास्कर जाधव, दिरानी कांचन विशाल जाधव, वैशाली कैलास गवई ऊर्फ वैशाली संजय अवसरमोल, संजय बाजीराव अवसरमोल, कल्पना रमेश खरात यांच्‍याविरुद्ध तक्रार दिली आहे. सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून चापटा बुक्‍क्यांनी मारहाण केली. शिविगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी दिली. तुला जर येथे राहायचे असेल तर चारचाकी घेण्यासाठी तुझे माहेरून दोन लाख रुपये घे, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला.