विवाहितेला बेदम मारहाण; पिंप्री देशमुखची घटना, पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः घराचा वरचा मजला बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून बांधकामासाठी २० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना पिंप्री देशमुख (ता. खामगाव) येथे १ जुलैच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सौ. निता भवरसिंग मोहिते (२७, रा. रा. पिंप्री देशमुख) यांनी पोलिसांत तक्रार दिली, तिचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून, तिला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः घराचा वरचा मजला बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून बांधकामासाठी २० हजार रुपये घेऊन ये, असे म्‍हणून विवाहितेला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना पिंप्री देशमुख (ता. खामगाव) येथे १ जुलैच्‍या सकाळी साडेनऊच्‍या सुमारास घडली.

सौ. निता भवरसिंग मोहिते (२७, रा. रा. पिंप्री देशमुख) यांनी पोलिसांत तक्रार दिली, तिचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून, तिला दोन मुले व एक मुलगी आहे. ती पतीसह आई-वडिलांच्‍या शेजारीच राहते. तिचे पती पुणे, औरंगाबाद येथे ठेकेदारीने बांधकाम करतात. १ जुलैला सकाळी स्वयंपाकाचे भांडे अंगणात धुत असताना तिचा पती भवरसिंग तिच्‍याकडे आला व तिला म्हणाला, की तुझ्या वडिलांकडून घराचा वरचा मजला बांधण्यासाठी २० हजार रुपये घेऊन ये.

माझे आई-वडील गरीब आहेत. त्यांच्‍याकडे पैसे नाहीत, असे विवाहितेने सांगितले असता पतीने काठीने पोटावर, पाठीवर डोळ्यांजवळ मारहाण केली, असे तक्रारीत विवाहितेने म्‍हटले आहे. पती नेहमी लहान सहान कारणावरून शिविगाळ करून मारहाण करतात. मुलांना सुध्दा मारहाण करतात. एखादे दिवशी खल्लास करून टाकीन अशी धमकी देतात, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी भवरसिंगविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.