दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्‍याचार! शरीरसंबंध ठेवतानाचे फोटो, व्हिडिओ काढले!!; शेगावमधील खळबळजनक घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३१ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करताना फोटो, व्हिडिओ काढण्यात आला. ही धक्कादायक घटना शेगावमध्ये समोर आली आहे. घटना वर्षभरापूर्वीची असली तरी आज, २५ सप्टेंबर रोजी विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. शेगाव येथील बालाजी फैल येथील ३१ वर्षीय विवाहिता सध्या …
 
दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्‍याचार! शरीरसंबंध ठेवतानाचे फोटो, व्हिडिओ काढले!!; शेगावमधील खळबळजनक घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३१ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्‍यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्‍याचार करताना फोटो, व्हिडिओ काढण्यात आला. ही धक्कादायक घटना शेगावमध्ये समोर आली आहे. घटना वर्षभरापूर्वीची असली तरी आज, २५ सप्टेंबर रोजी विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे.

शेगाव येथील बालाजी फैल येथील ३१ वर्षीय विवाहिता सध्या मलकापूर, अकोला येथे राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, शेगाव येथील माळीपुरा भागातील सूरज संतोष जावरकर याच्याशी तिची जानेवारी २०२० मध्ये ओळख झाली. सूरजने तिच्याशी जवळीक साधली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सूरजने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवले. त्याने तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार त्याची मागणी वाढत गेली.

कधी पीडितेच्या घरी जाऊन तर कधी पीडितेला लॉजवर बोलावून सूरज तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. या संबंधाचे अश्लील फोटो व चित्रिकरण सूरजने केले होते. काही दिवसांनी विवाहितेने सूरजला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने नकार दिला. आपल्यात घडलेले कुणाला सांगितले तर तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ सर्वांना पाठवीन, अशी धमकी सूरजने पीडितेला दिली. पीडितेने याबाबत अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र लैंगिक अत्याचार शेगाव शहर परिसरात झाल्याने गुन्ह्याची कागदपत्रे आज शेगाव शहर पोलीस ठाण्याला प्राप्त झाली आहेत.