विवाहितेस मारहाण करून घराबाहेर काढले, सहा जणांविरुद्ध गुन्हा, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेस मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना पळशी (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बोरी अडगाव (ता. खामगाव) येथील हर्षदा हरिदास गिरी (24) हिचे लग्न पळशी येथील हरिदास रामकृष्ण भील याच्यासोबत झाले आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवस …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेस मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना पळशी (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बोरी अडगाव (ता. खामगाव) येथील हर्षदा हरिदास गिरी (24) हिचे लग्न पळशी येथील हरिदास रामकृष्ण भील याच्यासोबत झाले आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर लगेच पैशासाठी तिचा छळ सुरू झाला. नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन ये, असे असे म्हणून तिला शिविगाळ करत मारहाण करण्यात आली व घराबाहेर काढून देण्यात आले. सप्टेंबरपासून तिला न्यायलाही कुणी आले नाही. त्यामुळे तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.