विवेकानंद आश्रमातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजवर 100%

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निष्काम कर्मयोगी प. पू. शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमातर्फे अत्याधुनिक असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. विवेकानंद आश्रम अत्यंत कमी दरात औषधी, भोजन-नास्ता आणि अॅम्बुलन्स सेवेसह वैद्यकीय सेवा देत आहेत. 23 रुग्ण येथे उपचार घेत असून, कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट शंभर टक्के आहे, हे विशेष. विवेकानंद आश्रमाचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निष्काम कर्मयोगी प. पू. शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमातर्फे अत्याधुनिक असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. विवेकानंद आश्रम अत्‍यंत कमी दरात औषधी, भोजन-नास्ता आणि अ‍ॅम्बुलन्स सेवेसह वैद्यकीय सेवा देत आहेत. 23 रुग्ण येथे उपचार घेत असून, कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट शंभर टक्के आहे, हे विशेष.

विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते हे स्वतः जातीने लक्ष घालून कोविड सेंटरमधील रुग्णांची विचारपूस करतात. गरिब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना तर अगदी मोफत उपचारही या कोविड सेंटरमध्ये दिले जात आहेत. निष्काम कर्मयोगी पू. शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली होती. त्यांनी आयुष्यभर या जनतेची ईश्वर समजूनच सेवा केली. त्यांच्या सेवाकार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी विवेकानंद आश्रम कटिबद्ध आहे, असे आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले.