विश्वासाने चावी सोपवलेल्यानेच फोडले घर!; धामणगाव बढेच्‍या घरफोडी प्रकरणी दोघे ताब्‍यात, सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची धडाकेबाज कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेब्रुवारीत धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे झालेल्या घरफोडीतील मुख्य आरोपीसह चोरीचा माल विकण्यासाठी मदत करणाऱ्याच्या मुसक्या आज, ३१ जुलैला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या.मुख्य आरोपी रवींद्र नामदेव बावस्कर (२७) याला नळकुंड (ता. मोताळा) येथून तर त्याचा साथीदार सुधाकर तुळशीराम धेंगे (४५, रा. जानोरी ता. शेगाव) याला शेगावमधून ताब्यात घेण्यात आले. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेब्रुवारीत धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे झालेल्या घरफोडीतील मुख्य आरोपीसह चोरीचा माल विकण्यासाठी मदत करणाऱ्याच्‍या मुसक्‍या आज, ३१ जुलैला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आवळल्‍या.मुख्य आरोपी रवींद्र नामदेव बावस्कर (२७) याला नळकुंड (ता. मोताळा) येथून तर त्याचा साथीदार सुधाकर तुळशीराम धेंगे (४५, रा. जानोरी ता. शेगाव) याला शेगावमधून ताब्यात घेण्यात आले.

धामणगाव बढे येथील छाया काकडे या २ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्‍यान बाहेरगावी गेल्या होत्‍या. ही संधी साधून चोरट्यांनी घर फोडले होते. जाताना घराची चावी त्यांनी विश्वासाने रवींद्र बावस्कर याच्याकडे दिली होती. १७ फेब्रुवारीला त्‍या परतल्यावर घरात चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर ज्याच्याकडे चावी दिली तोच घरफोड्या असल्याचे समोर आले. रवींद्रनेच घर फोडून घरातील दागिने व रोखरक्‍कम लंपास केली होती. त्‍याला सुधाकर धेंगे याने चोरीचे दागिने विकण्यासाठी मदत केली होती.

स्‍थानिक गुन्‍हे शाखेने दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याचे गंठन, गहुमनी पोत, सोन्याचे फूल जोड, अंगठी, ब्रासलेट, चांदीच्या पाटल्या, चांदीचे दंडकडे, सोन्याची एकदानी, रोख ६७ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा ४ लाख १५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा),अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव)यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ विलास काकड, दीपक पवार, पो.ना. गजानन आहेर, गजानन गोरले, विजय सोनोने, चालक पोकाँ सुधाकर बर्डे यांनी पार पाडली.