विष घेऊन युवकाची आत्महत्या; मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विषारी औषध प्राशन करून युवकाने आत्महत्या केली. ही घटना आज, ५ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता धोणखेड (ता. मोताळा) येथे घडली. सदाशिव लोळू पालवे (३५, रा. धोणखेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्याने विष प्राशन केले. अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी …
 
विष घेऊन युवकाची आत्महत्या; मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विषारी औषध प्राशन करून युवकाने आत्महत्या केली. ही घटना आज, ५ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता धोणखेड (ता. मोताळा) येथे घडली. सदाशिव लोळू पालवे (३५, रा. धोणखेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्याने विष प्राशन केले. अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.