विहिरीत आढळला मृतदेह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना काल, २१ जून रोजी सायंकाळी डोंगरशेवली (ता. चिखली) येथे समोर आली. डोंगरशेवली येथील शेतकरी रामेश्वर हिंमतराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह आढळला. त्यांनी स्वतः घटनेची माहिती अमडापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तपास अमडापूर पोलीस स्टेशनचे एएसआय अयुब खान, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना काल, २१ जून रोजी सायंकाळी डोंगरशेवली (ता. चिखली) येथे समोर आली. डोंगरशेवली येथील शेतकरी रामेश्वर हिंमतराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह आढळला. त्यांनी स्वतः घटनेची माहिती अमडापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तपास अमडापूर पोलीस स्टेशनचे एएसआय अयुब खान, पोकाँ सुनील राठोड करीत आहेत.