विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्‍महत्‍या; मलकापूर पांग्रा येथील घटना

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३६ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे आज, २६ जुलैला सकाळी समोर आली. गोविंद संपत नागरे (३६, रा. मलकापूर पांग्रा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ताे जिथे राहत होता, तिथेच मागे विहीर आहे. या विहिरीत त्याने उडी …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३६ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे आज, २६ जुलैला सकाळी समोर आली.

गोविंद संपत नागरे (३६, रा. मलकापूर पांग्रा) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. ताे जिथे राहत होता, तिथेच मागे विहीर आहे. या विहिरीत त्‍याने उडी घेऊन आत्महत्या केली. नागरे यांच्‍या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्‍याची पत्‍नी मुलांसह माहेरी राहत असल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच पोलीस पाटील पांडुरंग सोनुने यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर करत आहेत.