विहिरीत पडून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज, 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता समोर आली आहे. बेबीबाई मधुकर बावणे (55, रा. मोठी देवी, जगदंबानगर) असे या महिलेचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीबाई बावणे सकाळी 10 च्या सुमारास शौचासाठी वनविभागाच्या राणीबगीचा परिसरात गेल्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज, 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता समोर आली आहे. बेबीबाई मधुकर बावणे (55, रा. मोठी देवी, जगदंबानगर) असे या महिलेचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीबाई बावणे सकाळी 10 च्या सुमारास शौचासाठी वनविभागाच्या राणीबगीचा परिसरात गेल्या होत्या. काही मुलांना त्या विहिरीत जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या. परिसरातील लोकांनी बाहेर काढून त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे हलवण्यात आले. सायंकाळी 6 च्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेची आत्महत्या किंवा हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.