विहिरीत पाणी पाहायला गेलेल्‍या मजुराचा मृतदेहच आढळला!; जळगाव जामोद तालुक्यातील घटना, घात की अपघाताची चर्चा

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीला किती पाणी आले हे पहायला गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल, १ ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास समोर आली. तेरसिंग मनुसिंग गोचऱ्या (४०) असे मृत मजुराचे नाव आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत चर्चा सुरू आहे. तेरसिंग हा सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील शेतकरी …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीला किती पाणी आले हे पहायला गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल, १ ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास समोर आली. तेरसिंग मनुसिंग गोचऱ्या (४०) असे मृत मजुराचे नाव आहे. ही आत्‍महत्‍या आहे की घातपात याबाबत चर्चा सुरू आहे.

तेरसिंग हा सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील शेतकरी संतोष राठी यांच्या शेतात मजूर होता व राठी यांच्या शेतातच छोट्याशा कुटुंबासह राहत होता. काल सकाळी राठी शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तेरसिंगचा मृतदेह तरंगलेला दिसला. तेरसिंग याची पत्नी गीता हिने जळगाव पोलीस स्टेशन गाठून पती विहिरीत पडल्याची माहिती दिली. प्रकरणाची माहिती जळगाव जामोद पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सुनील जाधव यांच्‍या आदेशावरून एएसआय शेषराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल गवई यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून, तपास बीट जमादार अशोक वावगे करत आहेत.