वीज तारा घासून ठिणग्या पडल्‍याने 4 बैलगाड्यांसह कडबा खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा) ः विद्युत वाहिनीच्या तारा एकमेकांना घासून कडबा व बैलगाडीवर ठिणग्या पडल्याने आग लागली. यात कडब्यासह 4 बैलगाडी जळून खाक झाल्या. ही घटना काल, 15 मार्चला सकाळी 11 च्या सुमारास वावडी हरदो शिवारात (ता. जळगाव जामोद) घडली.भावट्या डावर, जहाज्या डावर, कालुसिंग जमरा, श्रीराम सोलंकी, सुभला सोलंकी, राजीराम डावर या शेतकऱ्यांचे आगीमुळे …
 

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा) ः विद्युत वाहिनीच्‍या तारा एकमेकांना घासून कडबा व बैलगाडीवर ठिणग्या पडल्याने आग लागली. यात कडब्‍यासह 4 बैलगाडी जळून खाक झाल्या. ही घटना काल, 15 मार्चला सकाळी 11 च्‍या सुमारास वावडी हरदो शिवारात (ता. जळगाव जामोद) घडली.
भावट्या डावर, जहाज्या डावर, कालुसिंग जमरा, श्रीराम सोलंकी, सुभला सोलंकी, राजीराम डावर या शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. ते बैलांसाठी कडबा आणायला सुनगाव परिसरातील वावडी हरदो शिवारातील मनोहर राऊत यांच्‍या शेतात गेले होते. तिथे त्‍यांनी आपापल्या बैलगाडीत कडबा भरला. त्‍याचवेळी विद्युत वाहिनीच्‍या तारा एकमेकांना घासून ठिणग्या या बैलगाडीवर पडल्‍या आणि शेतातील कडबा व बैलगाड्यांवरील कडब्‍याला आग लागली. महावितरण कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.