वृद्धाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या; खामगाव तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्ञानगंगापूर येथील 60 वर्षीय वयोवृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. श्रीकृष्ण नारायण महाले (रा. ज्ञानगंगापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्ञानगंगापूर येथील 60 वर्षीय वयोवृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 च्‍या सुमारास घडली. श्रीकृष्ण नारायण महाले (रा. ज्ञानगंगापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस कर्मचारी श्री. महाले करीत आहेत. आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहीपर्यंत समजू शकले नाही.