वेगळेच ‘रंग’ दाखवले… घराचे रंगकाम करता करता 17 वर्षीय मुलगी पळवली!; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराचे रंगकाम करणाऱ्या तरुणाने 17 वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेले. ही घटना मोताळा तालुक्यातील गिरोली येथे आज, 26 मे रोजी समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात मुन्ना विजय राठोड (25, रा. घाटपुरी ता. खामगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गिरोली येथील एका व्यक्तीच्या घराचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घराचे रंगकाम करणाऱ्या तरुणाने 17 वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेले. ही घटना मोताळा तालुक्यातील गिरोली येथे आज, 26 मे रोजी समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात मुन्ना विजय राठोड (25, रा. घाटपुरी ता. खामगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गिरोली येथील एका व्‍यक्‍तीच्‍या घराचे रंगकाम सुरू होते. 20 मेपासून विजय देवसिंग राठोड व मुन्‍ना देवसिंग राठोड (रा. घाटपुरी) हे बापलेक घर रंगविण्याचे काम करत होते. घरमालकाची अल्पवयीन मुलगी रंगकाम करणाऱ्यांना चहापाणी देत होती. त्यातच मुन्‍ना देवसिंग राठोड तिच्याशी वारंवार बोलत होता. 23 मे रोजी दुपारी मुलगी शौचास जाते म्‍हणून घरातून निघून गेली, ती परतलीच नाही. त्याच दिवशी दुपारी मुन्ना राठोड सुद्धा गावात आल्याचे तिच्या वडिलांना कळले. घाटपुरी येथील त्याच्या घरी जाऊन बघितले असता तो सुद्धा फरार असल्याचे कळले. त्‍यामुळे मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.